Krushi Vibhag Bharti 2023 | कृषी विभाग व्हायचंय मग हे प्रश्न आवश्य वाचा-krushi sevak question paper with answers-krushi sevak question paper

Krushi Vibhag Bharti 2023 | कृषी विभाग व्हायचंय मग हे प्रश्न आवश्य वाचा

Krushi Vibhag Bharti Question Papers अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये Krushi Vibhag Bharti Question Papers संबंधी प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का
तुम्ही
 MPSC, Police
Bharti, Talathi Bharti,
कृषी विभाग यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची
तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली
 25 Krushi Vibhag Bharti Question Papersतुम्हाला या स्पर्धा परीक्षा
पास करायला नक्कीच मदत करतील.

1) कोणत्या प्रयोगात कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो?

(कृषी सेवक 2018)
1) सकर्मक भावे प्रयोग
2) भावे प्रयोग
3) कर्मणी प्रयोग
4) कर्तरी प्रयोग

स्पष्टीकरण : कर्तरी प्रयोगात कर्ता क्रियापदावर अधिकार गाजवतो.

2) खालील वाक्यातील अलंकार ओळखा. समुद्रात खसखशीचा दाणा
पडला. मी पोहत जाऊन काढून आणला पण तेव्हा तो वाटाण्याएवढा
फुगला होता?  (कृषी सेवक 2018 )
1) रुपक
2) व्यतिरेक
3) अतिशयोक्ती
4) श्लेष
स्पष्टीकरण : एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात.

3) खालील वाक्यातील अलंकार ओळखा. (कृषी सेवक 2018 )
काकाने काकीच्या कपाटातले कापड काढून कात्रीने कापले.
1) यमक
2) अतिशयोक्ती
3) श्लेष
4) अनुप्रास

स्पष्टीकरण : जर कवितेच्या ओळीमध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती
होत असेल, तर तो अलंकार अनुप्रास असतो.

4) ‘नववधू प्रिया मी बावरतें’ ही कविता खालील वृत्त प्रकारातील आहे.
(कृषी सेवक 2018)
1) मंदारमाला
2) नववधू
3) वसंततिलका
4) भूजंगप्रयात

स्पष्टीकरण : नववधू प्रिया मी बावरते. हे मात्रावृत्त असून यामध्ये
लघु गुरु असा नियम पाळला जात नाही. ओळीतील
अक्षरांची संख्या सारखी नसली तरी प्रत्येक ओळीतील
मात्रांची संख्यामात्र सारखी असते. दिलेल्या ओळीत
नववधू हे मात्रावृत्त असून यात प्रत्येक ओळीत 16
मात्रा असतात व यती 10 व्या मात्रेवर असतो.

5)खालीलपैकी कोणता अक्षरगणवृत्ताचा प्रकार आहे?
(कृषी सेवक 2018 )
1) मालिनी
2) पादाकुलक
3) आर्या
4) दिंडी

स्पष्टीकरण : मालिनी हा अक्षरगणवृत्ताचा प्रकार असून प्रत्येक
ओळीतील अक्षरांची संख्या 15 असते, तसेच यती
आठव्या अक्षरावर असतो त्याचबरोबर ‘न न म य य’
असे गण असतात.

6) या अलंकारात उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली असते.
(कृषी सेवक 2018)
1) अर्थान्तरन्यास
2) अनन्वय
3) भ्रांतीमान
4) व्यतिरेक

स्पष्टीकरण : जेव्हा एखादा घटक एवढा अप्रतिम असतो की त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही म्हणून स्वत:बरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार असतो.

7) त्रिभुवन, चैघडा व पाचुंदा या तिन्ही शब्दांमधील समास खालीलप्रमाणे आहे.
(कृषी सेवक 2018)
1) कर्मधारय
2) तत्पुरुष
3) द्वंद्व
4) विगू

स्पष्टीकरण :संख्या व नाम मिळून एखादा समूह दर्शवित असतील तर तो विगू समास असतो.

8) उपमानाच्या जागी उपमेय असा भ्रम खालील अलंकारात होतो.
(कृषी सेवक 2018)
1) अनन्वय
2) उत्प्रेक्षा
3) भ्रांतीमान
4) अर्थान्तरन्यास

स्पष्टीकरण : उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा जेव्हा भ्रम होतो तेव्हा भ्रांतिमान अलंकार असतो.

9) ‘रावण रामाकडून मारला जातो.’ या वाक्यातील नेमका प्रयोग कोणता?
(कृषी सेवक 2018 )
1) कर्तरी प्रयोग
2) भावे प्रयोग
3) कर्मकर्तरी प्रयोग
4) पुराण कर्मणी

स्पष्टीकरण : हा प्रयोग इंग्रजी Passive Voice प्रमाणे असून यात कर्त्याला कडून प्रत्यय असतो, तसेच कर्म सुरुवातीला
घ्यावे असा दंडक असतो. म्हणून या प्रयोगाला कर्म-
कर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मनी प्रयोग असेही म्हणतात.

10) ‘दाम करी काम’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
(कृषी सेवक 2018 )
1) थोडे थोडे काम करत राहावे..
2) क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.
3) पैशाने सर्व कामे साध्य होतात.
4) वाईट कामातून अधिक पैसा मिळतो.

स्पष्टीकरण : दाम करी काम म्हणजेच पैशाने कोणतीही कामे होतात.

11) खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्तीच्या संकटासंबंधी नाही.
(कृषी सेवक 2018)

1) आगीत उडी मारणे
3) मोक्ष होणे
2) आभाळ कोसळणे
4) ग्रहण लागणे

स्पष्टीकरण : मोक्ष होणे याचा अर्थ मुक्ती मिळणे असा होतो हा
वाक्प्रचार संकटाशी संबंधित नाही.

12) ‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे’. या वाक्यातील प्रयोग कोणता?
(कृषी सेवक 2018)
1) कर्मणी प्रयोग
2) सकर्मक भावे प्रयोग
3) समापन कर्मणी प्रयोग
4) सकर्मक कर्तरी प्रयोग

स्पष्टीकरण : दिलेल्या वाक्यात कर्म असून कर्ता व कर्माला प्रत्यय आहेत, त्यामुळे हा सकर्मक भावे प्रयोग आहे.

13) भित्तीपत्रक हे,…… शिक्षणाचे साधन आहे.
(कृषी सेवक 2018)
1) अप्रक्षेपित दृक
2) प्रक्षेपित दृक
3) दृकश्राव्य
4) श्राव्य

स्पष्टीकरण : भित्तीपत्रक अप्रक्षेपित दृक शिक्षणाचे साधन आहे.

14) ‘वीरों का कैसा हो बसंत’ ह्या कवितेची रचना कुणी केली?
(कृषी सेवक 2018)
1) सुभद्रा कुमारी चौहान
3) हरिशंकर परसाई
2) पंडित माखनलाल चतुर्वेदी
4) गजानन माधव मुक्तिबोध
स्पष्टीकरण : वरील कवितेची रचना सुभद्राकुमारी चौहाण यांनी केली आहे.

15)……..मुळे वेळ, पैसा व श्रम यांची बचत होते.
(कृषी सेवक 2018)
1) समस्या
2) गरज
3) कार्यक्रम नियोजन
4) उद्दिष्ट
स्पष्टीकरण: कोणत्याही घटकाच्या नियोजनामुळे वेळ, पैसा व श्रम यांची बचत होते.

16) ……..या समास प्रकारात समासाचा विग्रह करताना अथवा, किंवा, वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात. (कृषी सेवक 2018)
1) वैकल्पिक द्वंद्व समास
2) इतरेतर द्वंद्व समास
3) समाहार द्वंद्व समास
4) दिवगू समास
स्पष्टीकरण : विग्रह करताना अथवा, किंवा, वा यासारख्या विकल्पदर्शक
उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागत असेल तर
तो वैकल्पिक द्वंद्व समास असतो.

17) सुरेशने पुस्तक वाचले आहे. या वाक्यातील काळ ओळखा.
(कृषी सेवक 2018)
1) पूर्ण भूतकाळ
2) पूर्ण वर्तमानकाळ
3) अपूर्ण भूतकाळ
4) अपूर्ण वर्तमानकाळ
स्पष्टीकरण : धातू + आ / ओ / ए / इ + आहे/आहेत = पूर्ण वर्तमानकाळ

18) ‘मीठभाकर, भाजीपाला, भांडीकुंडी, केरकचरा’ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? (कृषी सेवक 2018)
1) अव्ययीभाव समास
2) इतरेतर द्वंद्व समास
3) बहुव्रीही समास
4) समाहार द्वंद्व समास
स्पष्टीकरण:ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्या दोन
शब्दांशिवाय तशाच प्रकारच्या इतर घटकांचाही उल्लेख
करावा लागतो तेव्हा तो समाहार द्वंद्व समास असतो.

19) ‘आरक्त होऊनी फुलीनी प्रणयी पलाश
फेकी रसाल तरुही मधुगंधपाश
ऐकू न ये तुज पिकस्वर मंजुळे का?
वृत्ती वसंततिलका न तुझी खुले का?
वरील काव्यपंक्तीतील वृत्त कोणते (कृषी सेवक 2018)

1) भुजंगप्रयात
2) नववधू
3) पादाकुलक
4) वसंततिलका
स्पष्टीकरण : वसंततिलका हे अक्षरगणवृत्त असून यात प्रत्येक ओळीत चौदा अक्षरे असतात. यति आठव्या अक्षरावर असून गण त, भ, ज, ज, ग, ग असतात.

20) ‘बरेवाईट’ या समासाचा प्रकार ओळखा. (कृषी सेवक 2018)
1) वैकल्पिक द्वंद्व
2) कर्मधारय
3) बहुव्रीही
4) इतरेतर द्वंद्व
स्पष्टीकरण : विरुद्धार्थी शब्द असतील तर तो वैकल्पिक द्वंद्व समास असतो.

21) खालीलपैकी कोणते एक दिवअक्षीय अप्रक्षेपित दृकश्राव्य साधन आहे? (कृषी सेवक 2018 )
1) कठपुतळी
2) प्रारूप
3) नमुना
4) चित्रपट
स्पष्टीकरण :कठपुतळी हे एक दिवअक्षीय अप्रक्षेपित शैक्षणिक
दृक-श्राव्य साधन आहे.

22) ‘मी पोथी वाचत असेन.’ या वाक्याचा काळ ओळखा.
(कृषी सेवक 2018)
1) साधा वर्तमानकाळ
2) अपूर्ण भविष्यकाळ
3) अपूर्ण भूतकाळ
4) अपूर्ण वर्तमानकाळ
स्पष्टीकरण : क्रियापदाला ईन किंवा ईल प्रत्यय असल्यास ते क्रियापद भविष्यकाळात असते.

23) ‘खोड मोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?
(कृषी सेवक 2018)
1) शिक्षा करून एखादयाची सवय मोडणे 2) झाडाचे खोड मोडणे
3) खोड्या काढणे
4) मोडकळीस येणे
स्पष्टीकरण : खोड मोडणे याचा अर्थ एखादयाला अद्दल घडवून
त्याची सवय मोडणे असा होतो.

24) पाप-पुण्य या समासाचा प्रकार ओळखा. (कृषी सेवक 2018)
1) इतरेतर द्वंद्व
2) कर्मधारय
3) बहुव्रीही
4) वैकल्पिक द्वंद्व
स्पष्टीकरण : विरुद्धार्थी शब्द असल्यास तो वैकल्पिक द्वंद्व समास असतो.

25) “चार दिवस सासूचे, चार दिवस” ही म्हण पूर्ण करा.
कहा (कृषी सेवक 2018)
1) वडिलांचे
2) सुनेचे
3) भावांचे
4) बहिणीचे
स्पष्टीकरण : प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची वेळ येते.

आम्हाला आशा आहे की Krushi Vibhag Bharti Question Papers हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून
महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी
प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत
असेल किव्हा तुम्हाला
Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.


Leave a Comment