2 महिन्यात तलाठी व्हायचंय ?| तलाठी मराठी व्याकरण प्रश्न|Talathi Old Question Paper|Talathi Bharti Question Paper

2 महिन्यात तलाठी व्हायचंय ?| तलाठी मराठी व्याकरण प्रश्न|Talathi Old Question Paper|Talathi Bharti Question Paper 2023

Talathi Bharti Question Paper 2023अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये Talathi Bharti Question Paper 2023 संबंधी प्रश्न विचारले जातात.
पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल
, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच
कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य
आहे
, आज आम्ही
तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा
व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत
असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का
तुम्ही
 MPSC, Police
Bharti, Talathi Bharti
 यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची
तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली
४० Talathi Bharti Question Paper2023तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास
करायला नक्कीच मदत करतील.


(1) त्याचा हा किस्सा ऐकून तू खूप हसशील. आख्यात ओळखा.

(A) ई. आख्यात

(B)ऊ आख्यात

(C) लाख्यात

(D) इलाख्यात

2) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा

    अंथरलेला लाल गालिचा काय
सुंदर दिसत होता म्हणून सांगू

     (A) अंथरलेला

     (B) गालिचा

     (C) म्हणून

     (D) दिसत

      3) पुढील पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.

     एका बाईचे बाळ
कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते
.

    (A)संयोगचिन्ह

    (B) अपसरणचिन्ह

    (C) उद्गारचिन्ह

    (D) पूर्णविराम

     4) योग्य पर्यायाची निवड करा.

      मी उद्या तुझ्याबरोबर ——

     (A) पेशील

    (B) येतील

    (C) येईन                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            

5) पुढील
वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.

     घरातल्या वातावरणात
तीचा कोंडमारा होतो.

   (A) जीव खालीवर होणे

   (B) घुसमट होणे

   (C) उघडे पडणे

    (D) तंद्री लागणे

6) रिकाम्या जागी
योग्य पर्याय निवडा.

व्यायाम ही
……….करण्याची गोष्ट आहे.

(A) पेक्षा

B) अद्यापी

(C) दररोज

(D) प्रीत्यर्थ

7) पुढील वाक्याचा
प्रकार ओळखा.

पाऊस पडल्यावर डोंगर
हिरवे गार झाले.

 (A) प्रश्नार्थी

(B) मिश्र वाक्य

(C) संयुक्त वाक्य

(D) केवल वाक्य

8) रिकाम्या
जागी योग्य जोडशब्द लिहा.

आई
म्हणाली ———- टळो.

(A) इडातडा

(B) इडाकडा

(C) इडापीडा

(D) तडातडा

9) रिकाम्या जागी
योग्य पर्याय निवडा.

पूर्वी, पुढे, आधी ही ————–
अव्यये आहेत.

(A) शब्दयोगी अव्यये

(B) क्रियाविशेषण अव्यये

(C) केवलप्रयोगी अव्यये

(D) उभयान्वयी अव्यय

10दिलेल्या
शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा
.

विधान खरे X

(A) छोटे

(B) मोठे

(C) खोटे

(D) लांबलचक

11) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
उद्देश्याचा विस्तार करणारे शब्द है ———- असतात.

(A) अलंकार

(B) उद्देश

(C) उद्देश्यविस्तार

(D) विधेय

12) दिलेल्या
शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा
,

पर्वत

(A) अतूट

(B) अपूर्व

(C) अचल

(D) अफाट

13) कोणत्या विभक्तीचे
अनेकवचनाचे प्रत्यय नी
, ही शी, ई हे आहेत?

(A) तृतीया

(B) प्रथमा

(C) द्वितीया

(D) चतुर्थी

14) दिलेल्या
शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.

शिपाई शूर X

(A) लढवय्या

(B) पराक्रमी

(C) मित्रा

(D) संरक्षक

15) अनेकवचनांचे
एक वचन करा.


विद्यार्थ्यांनी
विषयानुसार योग्य तक्ते करावेत.

(A) विद्यार्थ्याने विषयानुसार योग्य तक्ते करावेत.

(B) विद्यार्थ्यांने विषयानुसार
योग्य तक्ता करावा.

(C) विद्यार्थ्यांनी विषयानुसार योग्य तक्ता करावा..

(D) विद्यार्थ्यांनी विषयानुसार योग्य तक्ते करावा.

16) पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.

———- इच्छा

(A) माझी

(B) निवडक

(C) हाडकुळी

(D) श्रींची

17) पुढील वाक्यात किती विशेषणे आहेत ते ओळखा. तापलेल्या उन्हाच्या
आडोशाला बसून खेळती आहे एक मुलगी केव्हाची..

(A)1

(B)

(C)3

(D)

18) दिलेल्या
धातूचे शक्य क्रियापद ओळखा.

पाहणे

(A) पाहवते

(B) पाहिला

(C) पहतात

(D) पहाते

19) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.. हातातोंडाशी
गाठ पाडणे

(A) जेमतेम खाण्यास मिळणे

(B) बरेच दिवसांनी मित्र भेटणे

(C) संपन्नता असणे

(D) योग्य वेळी योग्य गोष्ट मिळणे

20) पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.

अरेरे असा प्रसंग
वै-यावर पण येऊ नये

(A) उद्गारचिन्ह

(B) संयोगचिन्ह

(C) अपूर्णविराम

(D) अपसरण चिन्ह

21) कर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा.

गायकाने गीत ———-

(A) गायिला

(B) गायिली

(C) गायले

(D) गाते

22) रिकामी
जागा भरा.

दोन किंवा अधिक
केवलवाक्ये न्यूनत्वदर्शक अव्ययाने जोडली तर————-
  वाक्य तयार होते.

(A) प्रश्नार्थी

(B) मिश्र वाक्य

(C) संयुक्त वाक्य

(D) केवल वाक्य

23) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

बाबांनी त्या
शिक्षण संस्थेला आर्थिक मदतही खूप केली आणि तिथे मानद सचिव म्हणून कामही केले.

(A) प्रश्नार्थी

(B) मिश्र वाक्य

(C) संयुक्त वाक्य

(D) केवल वाक्य

24) पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.

माझे जाण्याचे ठिकण
येथून जवळ आहे.

(A) क्रियाविशेषण अव्यय

(B) केवलप्रयोगी अव्यय

(C) शब्दयोगी अव्यय

(D) उभयान्वयी अव्यय

25) योग्य पर्यायाची
निवड करा.

तू खूप मोठा ———-

(A) होतात

(B) होशील

(C) होईन

(D) होऊ

26) पुढील शब्दाचे लिंग
ओळखा.

नर्तिका

(A) पुल्लिंग

(B) स्त्रीलिंग

(C) नपुसकलिंग

(D) उभयलिंग

27) पुढील वाक्यात
पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.

आगरकरांनी
सुधारणांचा पाया महाराष्ट्रात रचला.

(A) खुणगाठ बांधणे

(B) ससेहोलपट होणे

(C) मुहूर्तमेढ रोवणे

(D) कित्ता
गिरवणे

28) वाक्यांतील
शब्दांचा योग्य क्रम लावून योग्य गद्य वाक्य ओळखा.

(A) उद्या माझा वाढदिवस आहे.

(B) आहे उद्या वाढदिवस माझा.

(C) वाढदिवस आहे उद्या माझा.

(D) माझा
आहे वाढदिवस उद्या.

29) पुढील वाक्यातील अव्यय ओळखा.

न्यायाधीशांसमक्ष सर्व
साक्षी पुरावे तपासले गेले.

(A) सर्व

(B) पुरावे

(C) समक्ष

(D) गेले.

30) दिलेल्या काळात परिवर्तन
करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

तो मुलगा कुत्र्याला
घाबरत आहे. (पूर्ण वर्तमानकाळ)

(A) घाबरला आहे

(B) घाबरला होता

(C) घाबरत असेल

(D) घाबरत होता

31) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.

बर्फ

(A) पुल्लिंग

(B) स्त्रीलिंग

(C) नपुसकलिंग

(D) उभयलिंग

32) पुढील वाक्यात पर्यायातील अचूक
वाक्प्रचार निवडा.

बाईंनी वर्गात
सांगितलेल्या सूचना सगळ्यांनी व्यवस्थित ऐकल्या.

(A) डंका पिटवणे

(B) कान देऊन ऐकणे

(C) पाठपुरावा करणे

(D) आव्हान स्वीकारणे

33) रिकाम्या जागी योग्य जोडशब्द
लिहा.

सणासाठी मुली ——— तयार
होत्या.

(A) नटूनथटून

(B) मिळूनमिसळून

(C) दमूनभागून

(D) हसूनखेळून

34) पुढील वाक्यांमध्ये योग्य ते
अव्यय घाला.

गरज सरो ——- वैद्य मरो.

(A) कारण

(B) नि

(C) सबब

(D) यास्तव

35) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

इथे जन्माचा सोहळा नाही
की मरणाचे दुःख नाही.

(A) प्रश्नार्थी

(B) मिश्र वाक्य

(C) संयुक्त वाक्य

(D) केवल वाक्य

36) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य
विरुद्धार्थी पर्याय शोधा.

किरकोळ –

(A) ठसठशीत

(B) स्पष्ट

(C) तुटपुंजे

(D) घाऊक

37) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.

चौकोन कधी वर्तुळाकर असू
शकेल का
?

(A) चौकोन

(B) वर्तुळकार

(C) शकेल

(D) का

38) अकबराला ऊंचीअत्तरे आवडत. यातील ऊंची या शब्दाचा अर्थ

(A) उंचपणा

(B) मौल्यवान

(C) जड

(D) सुगंधित

39) पुढील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. गरीब व्हावे असे कोणाला वाटते?

(A) गरीब व्हावे असे
एखाद्याला वाटत नाही.

(B) गरीब व्हावे असे आम्हाला
वाटत नाही.

(C) गरीब व्हावे असेच
सर्वांना वाटते.

(D) गरीब व्हावे असे कोणालाही
वाटत नाही.

40) पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार
ओळखा
, ‘अरेरे! किती दुःखद अंत झाला त्याचा!’

(A) शब्दयोगी अव्यय

(B) क्रियाविशेषण अव्यय

(C) केवलप्रयोगी अव्यय

(D) उभयान्वयी अव्यय

आम्हाला आशा आहे की Talathi Bharti Question Paperहा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून
महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी
प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत
असेल किव्हा तुम्हाला
Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment