वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण 2023 || #Vanrashak Bharti Question Paper Analysis || Forest Bharti 2023 03

वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण 2023 || #Vanrashak Bharti Question Paper Analysis || Forest Bharti 2023 03

वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण 2023: अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण 2023 संबंधी प्रश्न विचारले जातात. पण ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.

जर का तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली २० + Vanrashak Bharti Question Paper तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.1) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

A.) सुज्ञ x अज्ञ

B.) शत्रू x अरी

C.) सुलक्षणी x कुलक्षण

D.) सुंदर x कुरूप

2) सोहान शाळेत जात होता. या वाक्यातील काळ ओळखा.

A.) साधा भूतकाळ

B.) रीती भूतकाळ

C.) चालू भूतकाळ

D.) पूर्ण भूतकाळ

3) खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थाची योग्य जोडी ओळखा.
A.) धिंडवडे निघणे = सतत यशस्वी होणे

B.) आटापिटा करणे = पराभव स्वीकारणे

C.) माया पातळ होणे = प्रेम कमी होणे
D.) वाऱ्यावर सोडणे = पळून जाणे

4) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते, तो

A.) अष्टावधानी

B.) स्थितप्रज्ञ

C.) प्रज्ञावंत

D.) बुद्धिप्रामाण्यवादी

5) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा. मोगलमराठे

A.) कर्मधारय

B.) इतरेतरद्वंद्व

C.) तत्पुरुष

D.) अव्ययीभाव

6) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वांत योग्य शब्द निवडा. गरीब परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितच ———– आहे.
A.) वागवारस

B.) वाडकरी

C.) वाखाणण्याजोगे

D.) वाताहत

7) मना सज्जना तू कडेनेच जावे न होऊन कोणासही दुखवावे. या वाक्यातील वृत्त ओळखा.

A.) भुजंगप्रयात

B.) वसंततिलका

C.) पादाकुलक

D.) ओवी

8) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा. अग्निदिव्य करणे
A.) होळीच्या दिवशी लाकडे जाळून लोक अग्निदिव्य करतात.

B.) भूक लागली की पोट भरण्याचे अग्निदिव्य केले जाते.

C.) वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

D.) भटजींनी पूजा सांगताना होमहवन करून घरात अग्निदिव्य केले.

9) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

A.) नदी x सरिता

B.) नमस्कार x वंदन

C.) नवरा x पती

D.) उदय x अस्त

10) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

देव देते नि ———

A.) दैत्य

B.) कष्ट

C.) कर्म

D.) दिवा

11) 6 वर्षे ते 14 वर्षे वयामधील सर्व लहान मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण पुरवण्याविषयीच्या भारतीय संविधानाच्या 21-A अनुच्छेदाला काय म्हणून जाणले जाते?

A.) मुलभूत कर्तव्य

B.) मुलभूत अधिकार

C.) राज्य धोरणाचे निर्देशक तत्व

D.) नागरिकत्व

12) नायलॉनचे कपडे सुती कपड्यांपेक्षा जलद वळतात कारण

A.) त्यामध्ये पाणी शोषण्याचे प्रमाण जास्त असते

B.) त्यामध्ये पाणी शोषण्याचे प्रमाण कमी असते

C.) त्यात सच्छिद्र सामग्री असते

D.) त्यांची लवचिकता चांगली असते

13) ——- द्वारे क्षय रोगाचा (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो.

A.) डॉ. अँटनी वॅन लीयुवेनहोएक

B.) डॉ. लुइस पाश्वर

C.) डॉ. रॉबर्ट कोच

D.) डॉ. एडवर्ड जेन्नर

14) चक्रीवादळाच्या केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला ———- म्हणतात.

A.) मध्यबिंदू

B.) भूकंपबिंदू

C.) त्रुटी

D.) डोळा

15) महाराष्ट्रामधील कला हा लोक नृत्याचा प्रकार ——– देवाचा खेळकरपणा दर्शवतो

A.) कृष्ण

B.) शिव

C.) राम

D.) विष्णू

16) हे एक अँप आहे जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्रकाशित राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकावर (एक्यूआय) दर तासाला अद्यतने पुरवते.

A.) परमवीर

B.) समीर

C.) चक्र

D.) दिशा

17) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याच्या राज्यपालाच्या अधिकाराशी संबंधित तरतुद दिली आहे?

A.) अनुच्छेद 443

B.) अनुच्छेद 345

C.) अनुच्छेद 76

D.) अनुच्छेद 200

18) लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या ———- किनारपट्टी लगत स्थित आहेत?

A.) तामिळनाडू

B.) महाराष्ट्र

C.) केरळ

D.) आंध्र प्रदेश

19) राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील ——— नदीवर स्थित आहे?

A.) साबरमती

B.) कृष्णा

C.) भीमा

D.) अंबा

20) समुद्रतटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि ———– जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यांलगत आढळतात.

A.) नाशिक

B.) ठाणे

C.) सातारा

D.) पुणे

आम्हाला आशा आहे की वनरक्षक भरती प्रश्न उत्तरे स्पष्टीकरण 2023 हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला मराठी मधून महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी प्रश्नची माहिती झाली असेल. जर तुम्हाला Bharath Naukri या आमच्या वेबसाईट वर काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला Suggestion द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment