राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच – Question Papers Question Papers

   राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच – Question Papers Question Papers

1) वंदना सिनेमाला गेली. ह्या वाक्याचे अपूर्ण वर्तमानकाळ रूपांतर करताना खालीलपैकी कोणता पर्याय              निवडावा     लागेल.

(A) वंदना
सिनेमाला जाते.

(B) वंदना
सिनेमाला जात होती.

(C) वंदना सिनेमाला जात आहे.

(D) वंदना सिनेमाला गेली होती

2) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला
लेख

(A) पत्रावळी

(B) ताम्रपट

(C) तांबूल

(D) लेख

3) खालील शब्दाचा समास/ प्रकार ओळखा.

चरणकमल

(A) द्वितीया
तत्पुरुष

(B) नत्र
बहुव्रीहि

(C) कर्मधारय

(D) बहुव्रीहि

4) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य
पर्यायांमधून ओळखा
,

शड्डू ठोकणे

(A) गवंड्याने
घरबांधणी करते वेळेस भितीत शड्डू ठोकला.

(B) सुधा
मावशी शड्डू ठोकत अप्रतिम गोड जेवण बनवायची.

(C) मीनलने
शड्डू ठोकत झाडांना पाणी दिले.

(D) रिंगणात उतरताच राजा पहिलवानाने प्रतिस्पर्धासमोर शड्डू
ठोकला

5) पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.

कापड

(A) कडू

(B) जरतारी

(C) मऊ

(D) विणलेले

6) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.

 तिची वही हरवले.

(A) तिची
वही हरवलो.

(B) तिची वही हरवली.

(C) तिची वही हरवल्या.

7) पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.

तुला मुक्ती मिळू शकेल असे सांप्रत काही लाभेल, असे वाटत नाही.”

(A) उभयान्वयी
अवय

(B) शब्दयोगी
अव्यय

C) केवलप्रयोगी
अव्यय

(D) क्रियाविशेषण अव्यय

8) दिलेल्या धातूचे शक्य क्रियापद ओळखा. KHELANE

(A) खेळतो

(B) खेळते

(C) खेळवते

(D) खेळतात

9) दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा.

कासव

(A) मच्छ

(B) कच्छप

(C) वराह

(D) सुपर्ण

10) जोडशब्द नसलेला शब्द निवडा.

(A) बेलभांडार

(B) बोलघेवडा

(C) बाडबिस्तरा

(D) बाजारहाट

11) संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत, दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त
करणे शक्य आहे
?

(A) अनुच्छेद 153

(B) अनुच्छेद
158

(C) अनुच्छेद
156

(D) अनुच्छेद
163

12) पंतप्रधानांनी 24 फेब्रुवारी 2019
रोजी
गोरखपूरमधून (पीएम- किसान) प्रकल्प सुरू केला. “पीएम- किसान” चे पूर्ण स्वरूप काय
आहे
?

(A) प्रधान मंत्री किसान सन्मान निधी

(B) प्रधान
मंत्री किसान सिंचन सन्मान दर्शन

(C) प्रधान
मंत्री कृषी सिंचन सन्मान

(D) प्रधान
मंत्री किसान संघर्ष निर्माण

13) खालीलपैकी कोणत्या पहिल्या भारतीय कुस्तीपटूने ऑलिंपिकमध्ये रजत पदक
जिंकले होते
?

(A) योगेश्वर
दत्त

(B) साक्षी
मलिक

(C) गीता
फोगट

(D) सुशिल कुमार

14) वन्यजीव संवर्धनासाठी भारताची पहिली जननिक बैंक ——– येथे उघडली

(A) हैदराबाद

(B) मुंबई

(C) दिल्ली

(D) चंदीगढ़

15) भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टाच्या समवर्ती सूचीशी खालीलपैकी
कोणता घटक/ विषय संबंधित आहे
?

(A) सार्वजनिक
आरोग्य आणि स्वच्छता

(B) वने

(C) स्टॉक
एक्सचेंजेस

(D) कृषी

16) जर आपल्याला अतिरिक्त थकवा आल्यासारखे वाटले, तर खालीलपैकी कोणती वस्तू आपल्याला त्वरित ऊर्जा देऊ शकते?

(A) ग्लुकोजचे पाणी

(B) दूध

(C) अन्न

(D) पाणी

17) मराठी भाषा दिन हा ——- च्या जयंतीला साजरा केला जातो.

(A) ज्योतिबा
फुले

(B) कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज

(C) वीर
सावरकर

(D) गोविंदाग्रज

18) सांसर्गिक काळपुळी हा जीवघेणा रोग ———मुळे होतो.

(A) विषाणू

(B) बुरशी

(C) जंत

(D) जीवाणू

19) भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची
नेमणूक करताना राज्यपालाचा सल्ला घेतला जावा असे नमूद करतो.

(A) अनुच्छेद
112

(B) अनुच्छेद
400

(C) अनुच्छेद 217

(D) अनुच्छेद
356

20) ____वर्षामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसदरम्यान लखनऊ करारावर स्वाक्षरी
करण्यात आली होती.

(A) 1921

(B)1916

(C)1942

(D)1931

21) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.

कृष्णाश्रित

(A) बहुव्रीहि

(B) द्वितीय तत्पुरुष

(C) कर्मधारय

(D) दिगु

22) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य
पर्यायामधून ओळखा.

जिवाचे कान करून ऐकणे

(A) माझे
हरवलेले कानातले मी जिवाचे कान करून शोधले.

(B) सर धडा शिकवत असताना सोहान जिवाचे कान करून ऐकत असतो.

(C) बाबांनी
दिलेल्या सूचना जिवाचे कान करून ऐकल्यामुळे मनोहरला काहीच समजले नाही

(D) विनयने जिवाचे कान करून पैसा गोळा केला होता.

23) सोहान शाळेत जात होता. या वाक्यातील काळ ओळखा.

(A) साधा
भूतकाळ

(B) रीती
भूतकाळ

C)
चालू भूतकाळ

(D) पूर्ण
भूतकाळ

24) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही
परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते
, तो

(A) अष्टावधानी

(B) स्थितप्रज्ञ

(C) प्रज्ञावंत

(D) बुद्धिप्रामाण्यवादी

25) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वांत योग्य शब्द
निवडा. गरीब परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितच ———– आहे.

(A) वागवारस

(B) वाडकरी

(C) वाखाणण्याजोगे

(D) वाताहत

26) पुढीलपैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे?

(A) पद्धत

(B) पध्दत

(C) पद्दत

(D) पत

27) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

उखळ पांढरे होणे

(A) आश्चर्यकारक
घटना घडणे

(B) अचानक
संकट ओढवणे

(C) हाती
काहीच न उरणे

(D) अचानक वैभव प्राप्त होणे

28) रिकामी जागा भरा. मिश्रवाक्य म्हणजे ——- या दोन वाक्यांचे
मिश्रण होय.

(A) गौण
वाक्य
, साधे वाक्य

(B) केवल
वाक्य
, केवल वाक्य

(C) प्रधान वाक्य, गौण वाक्य

(D) संयुक्त
वाक्य
, गौण वाक्य 

29) उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

(A) खोल

(B) सपाट

(C) साधा

(D) सिन

30) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तेरड्याचा
रंग ——— दिवस

(A) एक

(B) दोन

(C)
तीन

(D) चार

31) लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या ———- किनारपट्टी लगत
स्थित आहेत
?

(A) तामिळनाडू

(B) महाराष्ट्र

(C) केरळ

(D) आंध्र
प्रदेश
 

32) ——- द्वारे क्षय रोगाचा (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा
स्मरणोत्सव म्हणून मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो.

(A) डॉ.
अँटनी वॅन लीयुवेनहोएक

(B) डॉ.
लुइस पाश्वर

(C) डॉ. रॉबर्ट कोच

(D) डॉ.
एडवर्ड जेन्नर
 

33) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये
राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याच्या राज्यपालाच्या
अधिकाराशी संबंधित तरतुद दिली आहे
?

(A) अनुच्छेद
443

(B) अनुच्छेद
345

(C) अनुच्छेद
76

(D) अनुच्छेद 200 

34) राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील ——— नदीवर स्थित आहे?

(A) साबरमती

(B) कृष्णा

(C) भीमा

(D) अंबा 

35) भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती
——– द्वारे केली जाते.

(A) राष्ट्रपती

(B) पंतप्रधान

(C) राज्यपाल

(D) कायदा
आणि न्याय मंत्री
 

36) महाराष्ट्रातील कृष्णा नदी हि ———– नदी आहे?

(A) उत्तर
वाहिनी

(B) पूर्व वाहिनी

(C) पश्चिम
वाहिनी

(D) दक्षिण
वाहिनी
 

37) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय
प्रणाली घेतली आहे
?

(A) कॅनडा

(B) पुनायटेड
किंगडम

(C) ऑस्ट्रेलिया

(D) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 

38) “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” ही
घोषणा ——— म्हटली होती.

(A) बाळ गंगाधर टिळक

(B) लाला
लजपत राय

(C) बिपीन
चंद्र पाल

(D) गोपाळ
कृष्ण गोखले
 

39) 1921 मध्ये मोपला विद्रोह कुठे झाला?

(A) मालाबार

(B) अलीपुर

(C) जम्मू

(D) कोलकाता 

40) महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालीलपैकी
कोणत्या जिल्ह्यात आहे
?

(A) सातारा

(B) रत्नागिरी

(C) पुणे

(D) नाशिक

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment